नाशिक, औरंगाबादनंतर एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी नाशिक आणि औरंगाबादला भेट दिली. त्यानंतर आता मंगळवारी (२ ऑगस्ट) ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत असा संपूर्ण दिवसभराचा त्यांचा दौरा असणार आहे. त्यात विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजता ते विभागीय आयुक्तालयात पाऊस, अतिवृष्टी आणि पीक पाहणीची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, दुपारच्या सुमारास फुरसुंगी पाणी योजनेच्या प्रकल्पाला भेट व पाहणी, जेजुरीच्या खंडोबा मंदिर देवस्थानाला भेट व दर्शन, सासवड येथे जाहीर सभा, हडपसर येथे बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उदघाटन, दहडूशेठ हलवाई मंदिराला भेट व दर्शन, गणेश मंडळ व नवरात्रोत्सवासंदर्भात बैठक ते घेणार आहेत. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास ते ठाण्याकडे परतणार आहेत.