गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:18 IST)

एकनाथ शिंदेंचा इशारा, 'आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी बोलेन'

anand dighe
"शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे, योग्यवेळी नक्की बोलेन," असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. 
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "आणखी काही गोष्टी माझ्या आणि त्यांच्यातल्या आहेत. त्या मी आज सांगणार नाही. मात्र, जसं समोरून बोलणं होईल, तसं मलाही बोलावं लागेल. मलाही भूकंप करावा लागेल.
 
"धर्मवीरांच्या बाबतीत देखील जे-जे काही झालं आहे, सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलं आहे. मात्र, प्रत्यक्ष जीवनात देखील ज्या काही घटना घडल्या आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. योग्यवेळी नक्की बोलेल."
 
यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी एकनाथ शिंदेंना उत्तर दिलंय.
 
"मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्याबाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार. मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?" असं उत्तर केदार दिघेंनी शिंदेंना दिलंय. एबीपी माझाने ही बातमी दिलीय.