शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (10:13 IST)

Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली

devendra fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्त त्यांचा प्रवास आणि सततचे दौरे असल्यामुळे झालेल्या तणावामुळे मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थतेमुळे त्यांनी विश्रांती घेण्यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील उपस्थित राहू शकले नाही. 
 
कर्नाटकाच्या दौऱ्यात त्यांनी भाजप उमेद्वाऱ्यांसाठी अनेक सभा घेतल्या नंतर त्यांनी कार्यक्रमानिमित्ताने अमरावती, नागपूर, भंडारा, पुणे चिंचवडचे दौरे केले. भर उन्हात झालेल्या दौऱ्यामुळे आणि थकव्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी आता विश्रांती घेण्यासाठी आपले सर्व कार्यक्रम स्थगित करून विश्रांती घेत आहे. 
अस्वस्थेमुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. 
 
 
Edited by - Priya Dixit