देवेंद्र फडणवीसांनी पोलीस दलासाठी असलेली डीजी योजना केली सुरु
महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना म्हणजे डीजी योजना. या योजनेतून कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच २० लाखापर्यंतचं कर्ज मिळतं. संजय पांडे जेव्हा महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी होते, तेव्हा ठाकरे सरकारने पोलिसांसाठी डीजी योजना बंद केली होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी ही योजना पुन्हा सुरू केली आहे. डीजी कर्जासाठी जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा निधी देण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कॉन्स्टेबल रँकपर्यंतच्या पोलिसांना आता खात्यांतर्गतच २० लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. ठाकरे सरकारने ही योजना बंद केली होती. त्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.