सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (14:39 IST)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

rain
दोन पावसांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु होता.  वाढत्या उकाड्यानंतररात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी काल रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज दुपारनंतर पुढील 3,4 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, घाट भागात‌ ढगाळ वातावरणाची अधिक शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उलाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 दुपारनंतर पुढील 3,4 तासांसाठी पावसाचा जारी करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, घाट भागात‌ ढगाळ वातरणाची अधिक शक्यता आहे.
 
यामुळे राज्यातील सांगली, कोल्हापूर. औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.