गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (08:57 IST)

धनगर आरक्षण :धनगर आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे

Suresh Bandgar
चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलक उपोषणावर ठाम आहेत. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी वैद्यकीय उपचार नाकारले आहेत. सोबतच उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

मी उपोषणाला निघतानाच माझ्या बायकोचे कुंकू पुसून आलो आहे. माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा, असे आधीच बायकोला सांगून आलो आहे. त्यामुळे धनगर आरक्षण अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील असे सुरेश बंडगर म्हणाले.
 
15सप्टेंबरला उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर दुसरे उपोषकर्ते सुरेश बंडगर यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आला. दरम्यानच्या काळात कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातही यावरून कलगीतुरा रंगला. माजी मंत्र्यांच्या गावात हे उपोषण सुरू असताना सरकारमधील एखादा मोठा नेता उपोषणस्थळी आणता येत नसेल तर राम शिंदे यांचे पक्षातील वजन कमी झाले आहे की काय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor