मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)

जनतेनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्धव ठाकरेंना ठेका दिला का? सोमय्या यांचा सवाल

Did the people give contract to Uddhav Thackeray to play with people's lives? Somaiya's question
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने कोरोना काळात लोकांच्या  जीवाशी खेळण्याचे पाप केले आहे. त्यामुळे कारवाई व्हायला हवी,” आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ते पुण्यात बोलते होते.  “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले त्या कंपनीच्या विरोधात पुणे पोलिसांनी पीएमआरडीएने, पुणे महानगरपालिकेने कारवाई का केली नाही? त्या कंपनीने पुन्हा एकदा घोटाळा केला. लोकांचा जीव घेतला… संजय राऊत यांच्या मित्रपरिवार आणि पार्टनरची कंपनी आहे म्हणून? रितसर लोकं मेली हे रिपोर्टमध्ये लिहिले आहे. उद्धव ठाकरेंनी कंपनीला ब्लॉक लिस्ट केले, दुसरी गोष्ट या कंपनाला कंत्राट दिलं कसं गेलं. पीएमआरडीएकडे या कंपनीची काहीच कागदपत्रे नाहीत. अर्ज सुद्धा नाही, तरी त्याला कंत्राट दिले. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्धव ठाकरेंना ठेका दिला का?” असा सवाल सोमय्यांनी केले आहे.
 
“तसेच याप्रकरणी पुणे पोलीस, पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेला ताबडतोब कोव्हिड घोटाळा करणारी जी कंपनी आहे हेल्थ केअर लाईफ लाईन तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले होते, तक्रार महापालिकेत होऊ दिले नाही. आता बघतो कशी कारवाई करत नाही,” अशा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
“त्या कंपनीवर कारवाई करावी लागणार, संजय राऊत यांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत रोज उठून धमकी कोणाला देतात. जर राऊत राऊत यांनी एवढी मस्ती आहे एवढी गुरमी आहे लोकांचा जीव घेणार, पीएमसी बँकेच 10 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपनीतून क्वीक ब्रेक घेणार, अशाप्रकारे बोगस कंपन्याच्या नावाने कोव्हिड कंत्राट घेणार, महाराष्ट्राच्या लोकांची हत्या करणार आणि त्यांना काय होणार नाही?,” असाही सोमय्या म्हणाले आहेत.