शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (15:08 IST)

लग्नाच्या एक दिवस आधी वधूचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली ज्यात लग्नाला एक दिवस बाकी असताना वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याच्या टाकीत संजनाचा मृतदेह आढळून आला आहे.  यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
गुरुवारी सकाळी साजेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यावर मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे तर गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 
 
 संजना श्रीनिवास वेर्णेकर असं मृत पावलेल्या 27 वर्षीय वधुचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. ती गडहिंग्लज येथील संकेश्वर रोड परिसरात वास्तव्याला होती. संजनाचा विवाह ठरलं असल्याने घरात लगीनघाई सुरू होती. अशात कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गुरुवारी सकाळी संजना पाणी आणण्यासाठी गेली असताना पाण्याच्या टाकीत पडली. नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. 
 
पाण्यासाठी गेलेली संजना बराच वेळ झालं तरही परत आली नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. यावेळी संजनाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.