शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (14:54 IST)

Jalgaon News पाय घसरल्याने जागीच मृत्यू

death
Died on the spot due to foot slip जळगाव येथे तिसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. हा अपघात मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीत घडला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव चंद्रराव पाटील वय 52 असे सांगण्यात येत आहे. 
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर‍ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.