शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शाळा शंभर टक्के डिजिटल करणार

महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
आज भाईंदरमधील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धुळे, ठाणे गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांमधील डिजिटल शाळा अभियानाअंतर्गत शंभर टक्के डिजिटल झालेल्या शाळांच्या 30 शिक्षण अधिकरी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

शासन आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी यांच्या सयुंक्त विद्यामाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार या वेळी उपस्थित होते.