सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (15:43 IST)

तरुणी स्कूटीसह थेट एटीएममध्ये

scooty
स्कूटीवर बसलेल्या तरुणीने चुकून एक्सलेटर वाढवला आणि ती थेट एटीएमची काच फोडून आत शिरल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नाशिकच्या सावता नगर परिसरात ही घटना घडली आहे.
  
एका एटीएम सेंटरसमोर एक तरुणी स्कूटीवर बसली होती. त्याच दरम्यान चुकून तरुणीकडून गाडीचा एक्सलेटर वाढला. एक्सलेटर जोरात दिल्याने गाडीने लगेचच वेग पकडला. स्कूटी इतकी जोरात होती की, समोर असलेल्या एटीएमची काच फोडून तरुणी स्कूटीसह एटीएमच्या आत शिरली. या घटनेत सुदैवाने मोठी हानी झालेली नाहीये. मात्र, एटीएम आणि गाडीचे नुकसान झाले आहे.अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला आहे.