बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (09:10 IST)

मराठा आरक्षणाविरोधातली याचिका फेटाळा, सरकारची विनंती

Dismissing the petition against Maratha Reservation
मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती  राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी  49 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केले आहे. तसेच यायिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात दिलेली आकडेवारी निराधार असल्याचा दावा राज्य सरकारने या प्रतिज्ञा पत्रामधून केला आहे. 
 
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर मराठा समालाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. तसेच या आरक्षणाबाबतच्या विधेयकाला विधिमंडळाने  एकमुखाने मंजुरी दिली आहे.