मध्यस्थींच्या मार्फत सामंजस्यानं वाद सोडवणार, धनंजय मुंडे यांच्याकडून हमीपत्र सादर
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली आहे. न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यापुढे यावर सुनावणी झाली.
हायकोर्टात या दोन्ही बाजूंनी आपापसातला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्यास तयारी असल्याचं हमीपत्र हायकोर्टात सादर केलं. या मध्यस्थाचा सारा खर्च धनंजय मुंडे करणार असल्याचंही या हमीपत्रात म्हटलेलं आहे. डिसेंबर महिन्यात हा दावा मुंडे यांनी हायकोर्टात केल्यानंतर या महिलेच्या बहिणीनं धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप लावत त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांत ही तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना लेखी कळवलं होतं.