बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: हिंगोली , गुरूवार, 5 मे 2022 (21:52 IST)

चारित्र्याच्या संशयातून वाद विकोपाला; हिंगोलीत चाकुने वार करत पत्नीची हत्या

murder
चारित्र्याच्या संशयावरुन होणाऱ्या वादाच्या घटनांमध्ये मागच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पती पत्नींमध्ये होणारी भांडणं, घरघुती हिंसाचार आणि त्यातून होणाऱ्या अनेक गुन्ह्यांची कारणं ही अनेकदा हीच असतात. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यातील सारोळा शिवारात एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सारोळा शिवारात पतीने चाकूने वार करून पत्नीची निर्घुण पणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडलीये. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पती विश्वनाथ पोटे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदरील पती हा आपल्या पत्नीवर वारंवार चारित्र्यावरुन संशय घेत असत. यापूर्वी देखील चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पतीने आपल्या पत्नीस मारहाण केली होती. पती मारहाण करत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरी जाऊन राहत होती. मात्र आपली पत्नी वस्मत शिवारातील सारोळा भागात काम करण्यासाठी आल्याची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर पतीने शेत गाठलं. पत्नीवर वार करत तिची निर्घुणपणे हत्या करून पळ काढला. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी पतीविरोधात वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.