1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:05 IST)

तुम्हाला कायदा-संविधान कळतं का? शेलारांचा राऊतांना सवाल

ashish shelar
"महाविकास आघाडीत 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद 164 (1A) सांगत12 सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे! अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का?" असा सवाल भाजप ते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला आहे.
 
संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा, याच्याशी संबंधित आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा 15% अधिक मंत्री नको,पण असे करताना किमान 12 असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद. तेथे नियमाने केवळ 6 मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने 12 आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपला, असं शेलार पुढे म्हणाले आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.