शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (21:43 IST)

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री : विनायक मेटे

vinayak mete
ठाकरे सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम देखील सरकारने केले आहे. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आहे. 
 
यावेळी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदी. देखील उपस्थित होते. अडीच वर्षाच्या काळात मी अनेक मोर्चे काढले. पण महाविकास आघाडीने यावर कधीही लक्ष दिलं नाही. आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं. मागील सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं विनायक मेटे म्हणाले.