रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (15:45 IST)

केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केलाय, असा घणाघात राऊतांनी केला

sanjay devendra
शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे  आणि त्यांच्या गटातील आमदार आणि भाजप यांच्यात पुढील काही दिवसांत तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसतील असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत  यांनी केलाय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसतेय. केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केलाय, असा घणाघात राऊतांनी केलाय.एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही.त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत अशी टाकाही त्यांनी यावेळी केली.