शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (15:34 IST)

एकनाथ शिंदे यांची आपण फक्त सदिच्छा भेट घेतली -राजेंद्र गावित

शिवसेनेच्या १२ खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार गावित हे शिंदे गटात सामिल झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता राजेंद्र गावित यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
 
शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचा खुलासा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची आपण फक्त सदिच्छा भेट घेतल्याचे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.

“माझ्या मतदारसंघातील एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक गावांसोबत रस्ते जोडलेले नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधी त्यांना भेटू शकतात. माझ्या मतदार संघातील कामे करुन घेण्यासाठी त्यांना भेटलो,” अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी टिव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.