शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (12:21 IST)

पालघर जिल्ह्यातील नगरसेवक, पदाधिकारी, शिंदे गटात

uddhav shinde
शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी बंड  केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता स्थानिक पातळीचे नगरसेवक आणि पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य आता शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पालघर जिल्ह्यातील बहुसंख्यक शिवसेने कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील बहुसंख्यक  शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या गटातून गळती तर एकनाथ शिंदे यांच्या गटात भरती सुरु आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते आणि बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत असल्यामुळे शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे.