संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या निर्णय घेणार , मुख्यमंत्रीची घोषणा
महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्यामुळे उद्या कॅबिनेट घेऊन आम्ही हे निर्णय रद्द करणार आहे. कारण जेव्हा सरकार अल्पमतात असते त्यावेळी कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. माविआ सरकारने अखेरच्या कॅबिनेट मध्ये तब्बल 200 निर्णय घेतले आहेत जे बेकायदेशीर असून उद्या कोणीही या निर्णयाबाबद्दल विरोध करू शकतो. त्यामुळे आम्ही हे निर्णय रद्द करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आम्ही संभाजीनगर नावाला स्टे दिलेला नाही.बाळासाहेबांनी औरंगाबाद याचे नाव संभाजीनगर असे व्हावे असे बोलून दाखवले होते. त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला आम्ही स्टे दिलेला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र नाट्यमंदिरात गटाच्या आयोजित कार्यक्रमात सांगितले. मी एकटा मुख्यमंत्री नसून तर हे सर्व 50 आमदार मुख्यमंत्री आहेत. हे आमचे स्थिर सरकार आहे. कुणीही हे सरकार पाडणार नाही.असे ही ते म्हणाले.
आम्ही पक्ष प्रमुखांना चार ते पाच वेळा भेटून त्यांचे ऐकण्याचे सांगितल्यावर देखील त्यांनी ऐकले नाही त्यामुळे आम्ही सर्वानी मिळून पक्षाला नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शब्दाला स्थगिती दिलेली नाही विपक्षाने कितीही खोटं बोलले तरी ही ते न पटणारे आहेत. माविआ मध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यात आले.असा आरोप त्यांनी माविआ सरकार वर केला आहे.