गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (16:09 IST)

अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

ajit panwar
माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज नगर जिल्हात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अकोला दौऱ्यावर आहेत. यांचा वाहनाचा ताफा सभास्थळी जात असताना शेतकऱ्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवला असून शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अटक केल्याचा निषेध नोंदविला. 
 
दशरथ सावंत यांना अजित पवार यांची भेट घ्यायची हाेती परंतु पवार यांनी भेट नाकारल्यानंतर पाेलीसांनी सावंत यांना ताब्यात घेतले. या मुळे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी अजित पवारांच्या वाहनाचा ताफा अडविला. पवार यांनी आज अकोला येथे अशा मावेशी, माणिक ओझरला भेट दिली आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. या वेळी अकोल्याच्या आमदारांनी त्यांना नुकसानाची माहिती दिली. पवारांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याची सूचना दिली.

पवार हे मधुकर पिचड यांच्या विरोधात अगस्ती कारखाना निवडणूक प्रचार सभेसाठी आले असताना सभास्थळी जात असताना त्यांचा ताफा अडविला आणि मधुकर पिचड यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.