शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: देवाळे , शुक्रवार, 15 जुलै 2022 (15:46 IST)

लग्नाच्याआधीच नवरदेवाचा मृत्यू

पन्हाळा तालुक्यातील मसूदमाले येथील योगेश चंद्रकांत सणगर वय 27 याचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू जाला. त्याचे आज लग्न होते. त्याच्या लहान भावाचे आठ महिन्यापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता तर वडिलांचे दीड वर्षआधी कॅन्सरने निधन झाले होते. दीड वर्षात कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने मसूदमाले आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योगेशचे आज लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू असताना त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तातडीने कोडोली येथील खासदी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याला दुसरा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. योगेश महावितरणमध्ये काम करीत होता.