शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (15:05 IST)

केसरकर यांनी माध्यमांसमोर शरद पवारांची जाहीर माफी मागितली

Deepak Vasant Kesarkar
शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. दरम्यान  आता दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर शरद पवारांची जाहीर माफी मागितली आहे. शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे, प्रत्येकाला त्यांचा आदर आहे. त्यामुळे चुकून सुद्धा माझ्या तोंडून शरद पवारांबद्दल एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर मी त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. आवश्यकता असेत तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, अशी भूमिका केसकरांनी जाहीर केली. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होतो.
 
यावेळी केसरकर म्हणाले की, मी दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख होता. परंतु मी शरद पवारांबद्दल कधीही अपशब्द वापरला नाही. माझ्या जीवनाच्या जडघडणीमध्ये ज्या नेत्यांचा मोठा वाटा आहे त्यापैकी एक शरद पवार आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही.
 
शिवसेनेत फूट पडली त्यासंदर्भात वक्तव्ये केली होती ती घडलेली वस्तूस्थिती होती. त्यामुळे वस्तूस्थितीचा उल्लेख केला. 2014 मध्ये वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या त्यानंतर सरकार स्थापन झालं त्यावेळी देखील पवारांनी आपली भूमिका जाहीर केली, भाजपला त्यांनी बिनशर्थ पाठींबा जाहीर केला, त्यामुळे त्याकाळातही शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली होती, या घडलेल्या घटना आहेत. या घडलेल्या घटनांचा आणि त्याबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काहीही संबंध येत नाही अस स्पष्टीकरण देखील केसरकरांनी दिले.