गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:23 IST)

अबब, चक्क सव्वा दोन लाख रूपयांचा मासा

डोंबिवलीतील ‘मत्स्य प्रदर्शनात’ असलेल्या माशाची किंमत चक्क  “सव्वा दोन लाख रूपये आहे. या किंमती माशाला पाहण्यासाठी  प्रदर्शनात लोकांची गर्दी झाली आहे. हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे याठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांची किंमतही फक्त 25 रुपयांपासून सुरू होऊन ती तब्बल 2 लाख 25 हजार रूपयांच्या घरात आहे. ज्याच्या घरात दुर्मिळ असणाऱ्या या ‘एरोवाना’ नामक असतो त्याची प्रचंड भरभराट होते असे म्हटले जाते. त्यामुळेच दुर्मिळ असणाऱ्या या ‘एरोवाना’ नामक  माशाची किंमत 2 लाखांच्या घरात आहे. या माशाला चीनमध्ये देवासारखे पुजले जाते. चांगल्या, सकारात्मक गोष्टींचे आणि भरभराटीचे प्रतिक म्हणून ‘गॉड ऑफ चायना’ नावाने त्याला ओळखले जाते.

या एरोवाना माशाबरोबरच ट्रॉपिकल फिश, चिकलीड फिश, स्टार फिश, ऑरनामेंटल फिश, जेलिफिश, पारदर्शक मासे, सागरी वनस्पतींसह दुर्मिळ ऑक्टोपसही या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.