सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (10:19 IST)

फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका - अनिल गोटे

देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका, अशा आशयाचं पत्र माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना लिहिलंय.
 
अनिल गोटेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून पत्रात लिहिलंय की, "तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर फायदाच होईल. किमान फसवणूक आणि नंतर पश्चाताप होणार नाही, ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका."
 
"फडणवीसांनी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. मनाचा इतका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे," असा सल्ला गोटेंनी शिंदेंना दिला.