महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या नादाला लागू नका, संजय राऊत यांचा जे. पी. नड्डा यांना सल्ला  
					
										
                                       
                  
                  				  महाराष्ट्रातील सध्याच्या भाजप नेत्यांच्या नादाला लागू नका, अन्यथा राज्यातला उरला-सुरला भाजपदेखील नष्ट होईल, असा सल्ला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिला आहे.
				  													
						
																							
									  
	महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊत यांनी वरील वक्तव्य केलं.
				  				  
	 
	आम्ही पाहिला तो भाजप आणि आताचा भाजप यांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. जे. पी. नड्डा यांना मी कायम एक संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या कानात भाजपाच्या काही कपटी, कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर त्यांच्या नादी लागू नये. अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल, असं संजय राऊत म्हणाले.