'अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं?'
अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे.
मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते.
मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल असं कडू यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "राजकारणी भाषणं करतात मराठीवर बोलतात मात्र आपली पोरं इंग्रजी शाळेत शिकवतात. आता गरीबाच्या पोराला देखील अक्कल आली आहे. श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावं मग आम्ही मराठीत का घालावं, अशी भूमिका कडू यांनी मांडली.