1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरुच आहे.  चौकशीत काय तथ्य समोर आल्याचे बोलले जात आहे. मात्र ही माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.    
 
अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर छापेसत्र सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी केंद्र सरकारला जोरदार टोलाही लगावला. पाहुण्यांकडून चौकशी सुरु आहे, असे म्हणत केंद्र सरकारला टोकले. सलग तिस-या दिवशी आयकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगर, नंदूरबारमध्ये  छापेसत्र सुरू आहे. चौकशीत काय तथ्य समोर आले आहे, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे. 
 
कोल्हापुरात अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊस आणि घरावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरूच आहे. तर पुण्यातही दोन ठिकाणी चौकशी सुरू आहे. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे पथक तळ ठोकून आहे. मोदीबागेत नीता पाटील आणि पंचवटीमध्ये रजनी इंदुलकर राहतात. दोन्ही ठिकाणी आयकरचे अधिकारी, कर्मचारी झडती घेत आहेत. नंदूरबारच्या आयान मल्टीट्रेड कारखान्यात काल रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती.