शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (09:04 IST)

तीनही बहिणी खंबीर, यातून बाहेर पडतील - सुप्रिया सुळे

अजित पवारांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्त्वावर विश्वास आहे, तीनही बहिणी खंबीर आहेत, यातून बाहेर पडतील," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

"छत्रपतींचं नाव भाषणात घेणारे दिल्लीतले नेते छत्रपतींच्या विचाराकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधीही महिलांना टार्गेट केलं नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.