शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)

क्रूझ पार्टीतील एकाला सोडलं, तो भाजप नेत्याचा मेव्हणा’; NCBभोवती संशयाचे जाळे

ज्या क्रूझ ड्रग पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि त्याच्या अन्य मित्रांना अटक करण्यात आली. त्याच पार्टीतील दोन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सोडून दिले. यातील एक जण हा भाजप नेत्याचा मेव्हणा असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उजेडात आणली आहे. एनसीबीच्या कारभारावर पहिल्या दिवसापासूनच मलिक यांनी संशय व्यक्त केला आहे. पारदर्शी कारभार एनसीबी करीत नसून एनसीबीच्या आणखी गंभीर बाबींचा खुलासा मलिक हे करणार आहेत. त्यासाठीच ते  शनिवारी (९ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी भवनात होणाऱ्या या परिषदेत आपण अनेक पुरावेही सादर करणार आहोत. तेच सध्या गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मलिक आणखी काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.