शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (15:38 IST)

फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे होर्डिंग,बॅनर्स लावू नका,जाहिरातबाजी करू नका,

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा येत्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने उत्सव करू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग,बॅनर्स लावू नका,जाहिरातबाजी करू नका,असं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाच्या कोणत्याही नेते/कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नयेत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत,असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.
 
होर्डिंग,बॅनर,जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल त्यामुळेया सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत.भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे.त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे,असे आवाहन सुद्धा भाजपकडून करण्यात आले आहे.