बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (10:37 IST)

11 वी प्रवेशासाठी CET रजिस्ट्रेशन आजपासून सुरु

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी 10 वी आणि 12वी च्या परीक्षा राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या. दहावी च्या निकालानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 11 वी च्या प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली.त्याप्रमाणे CET ची परीक्षा ऑगस्ट मध्ये घेतली जाणार असून या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया आज पासून म्हणजे 19 जुलै पासून सुरु होत आहे.
 
CET ची परीक्षा ऐच्छिक असून ज्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या साठी ही परीक्षा आहे.या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांकावरच विद्यार्थी 11वी मध्ये प्रवेश मिळवू शकतील. 
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर CET ची लिंक उघडा नंतर या मध्ये 10 वी चा रोलनंबर टाकून CET परिक्षेसाठी अर्ज भरता येईल.या मध्ये दोन पर्याय येतील आपणास परीक्षा द्यायची आहे किंवा नाही.त्यामधून योग्य पर्यायाची निवड करून CET ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.