मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (08:12 IST)

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात कडक संचारबंदी लागू

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे प्रतीकात्मक पद्धतीने हा सोहळा साजरा होणार आहे.दहा मानाच्या पालख्यामधील वारकऱ्यांना व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश असणार नाही.
 
संचारबंदी सुरू झाल्यापासून पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकॅडींग टाकून बंद करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून प्रदक्षिणा मार्गावर ही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.चंद्रभागा नदी कडे जाणारे रस्ते टाकून बंद करण्यात आलेले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता पंढरपूर मध्ये इतर सर्व स्थापना संचारबंदी च्या काळामध्ये बंद असणार आहेत.
 
24 जुलै च्या दुपारपर्यंत संचार बंदी असणार आहे. 24 जुलैला पौर्णिमेचा काला झाल्यानंतर सर्व पालख्या पंढरपुरात तून बाहेर पडल्यानंतर संचारबंदी शिथिल होणार आहे.