बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (08:01 IST)

वारकर्यांवरील निर्बंध शिथिल केले नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात फिरकु देणार नाही; विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचा इशारा

महाराष्ट्रात वारकर्यांन वर होणार्या निर्बंधा बाबतीत विश्व हिंदु परिषद बजरंग दल व अखिल भारतीय वारकरी महा मंडळाच्या वतीने मावळ तहसील दारांना निवेदन देण्यात आले.विश्व हिंदु परिषद बजरंग दल व वारकरी महामंडळाच्या माध्यमातुन महाराष्ट्र भर आंदोलन घेण्यात येत असताना त्याच प्रकारे मावळातही हे आंदोलन घेण्यात आले.पोटोबा महाराज मंदिर पासुन टाळ मृदुंगाच्या गजरात भगवी पताका सोबत घेवुन निवडक वारकर्यांसह बजरंगदलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालया पर्यंत अभंगाच्या स्वरात मोर्चा नेण्यात आला .कोरोणा नियम पाळुन मा तहसील दारांना निवेदन देण्यात आले.
 
या वेळी बोलत असताना विश्व हिंदु परिषद सह मंत्री मोरेश्वर पोपळे यांनी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या सातशे वर्षांच्या पायी वारीला खंड पडला असुन आपला नाकर्ते पणा लपवण्या साठी वारकर्यांवर निर्बंध लादुन वारकरी परंपरा खंडीत करण्याची भुमीका या शासनाच्या दिसत आहे. मुगल कालखंड, इंग्रज कालखंडातही वारी कधी बंद झाली नाही परंतु या नतद्रष्टा शासनाने ते करुन दाखवल त्यामळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर शासनाने आपल्या भुमिकेत बदल केला नाही तर वारकर्यांच्या सहकार्याने विश्व हिंदु परिषद बजरंग दल मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करेल असा इशाराच प्रशासनाला दिला.
 
या वेळी अखिल वारकरी मंडळाच्या वतीने नारायण ढोरे बोलत असताना वारकरी पुर्ण कोरोना नियम पालण करुन जर प्रमुख पालख्या जाणार असतील तर शासनाने अशी नाकरती भुमीका घेणे योग्य नाही. नियम पाळुन वारीला परवानगी द्यावी अन्यथा शासनाच्या विरोधात घरा घरातुन वारकरी रस्त्यावर उतरुन मुख्यमंत्रांना पंढरपुरात जाऊच दिल जाणार नाही.