बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (08:48 IST)

महिला रूग्णच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध ठेवायचा नारधान डॉक्टर

नवी मुंबई बेलापूर येथे धक्कदायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये नराधम डॉक्टर हा महिला रूग्णच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरसंबंध ठेवत होता. त्यांच्यावर अत्याचार करत होता. हा सर्व प्रकार एका अल्पवयीन मुलीमुळे उघड झाला आहे. गरीब महिलांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत हा अत्याचार करत होता.
 
महिला रुग्ण  कंपाउंडर यांना वासनेचे बळी करणाऱ्या 55 वर्षीय डॉक्टर ला एनआरआय पोलिसांनीअटक केली असून, दिवाळे गावात त्याचा दवाखाना आहे. या डॉक्ट र चे नाव डॉ. संजय लाड (५५) असे असून याने क्लिनिकमध्ये कामास असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर क्लिनिकमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. सदर  मुलीच्या तक्रारीवरून डॉ. लाड याला बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली एनआरआय पोलिसांनीअटककेली आहे. या नराधम डॉक्टरने त्याच्या क्लिनिकमध्ये यापूर्वी अनेक तरुणींवर तसेच उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या आगोदर त्याने अनेक मुलीना आपल्या वासनेचा बळी बनवले होते आणि  त्यांच्यावर अत्याचार केले होते. हे सर्व आता पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.डॉ. लाड हा बीएएमएस डॉक्टर असून तो गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहे. तसेच, तो गेल्या अनेक वर्षांपासून सीबीडी-बेलापूरमधील दिवाळे गावात आपले क्लिनिक चालवत आहे. हा सर्व प्रकार घृणास्पद असून त्यामुळे डॉक्टर पेशाला कलंक लागला आहे.