डॉ. मिलिंद कांबळे यांची बी २० च्या राष्ट्रीय समितीत निवड
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक डॉ. मिलिंद कांबळे यांची बी २० च्या राष्ट्रीय समितीत निवड करण्यात आली आहे.टाटा ग्रुपचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन हे समितीचे अध्यक्ष आहेत.
सीआयआयचे अध्यक्ष संजीव बजाज, आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोएंका यांच्यासह कांबळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. कांबळे सध्या आयआयएम, जम्मूचे अध्यक्ष आहेत. केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर ते सल्लागार म्हणून काम पाहात आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor