बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (13:30 IST)

लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार,चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्यात येणार

ladaki bahin yojna
राज्यात विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजयानंतर महाआघाडीचे सरकार स्थापन झाले असून लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहिणी घेत आहे. या निवडणुकीच्या विजयात मोठा वाटा लाडकी बहिणींचा आहे. 
आता भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 
 
या योजनेसाठी विहित नियम न पाळता लाडकी बहिणींकडून लाभ घेतल्या जात आहे अशी तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले.अशा स्थितीत आता अर्जाची तपासणी करण्यात येईल. या अंतर्गत नियमबाह्य भरलेले अर्ज अपात्र ठरवले जाणार असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. 
तक्रारी शिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची चौकशी करणार नसल्याचे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिलांनी या योजनेचे विहित निकष पाळले नाही त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
लाभार्थींसाठी पात्रता नियमावली -
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी  महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. 
लाभार्थी महिलांकडे चारचाकी नसावी. 
महिलांनी दोन अर्ज केले असल्यास त्यांचा अर्ज अपात्र होणार. 
आधार कार्डात आणि बँकेत नाव वेगळे असल्यास लाभार्थी महिला अपात्र ठरवले जाणार. 
आंतरराज्य महिला या साठी अपात्र असणार. 
Edited By - Priya Dixit