गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:25 IST)

एकविरा देवीचा कळस चोरीला

देश आणि राज्यातील अनेक भक्त असलेल्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराला बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही चोरी  सोमवारी रात्री झाली आहे. यामध्ये चोरांनी  मंदिराला तीन वर्षापूर्वी भाविकाने सोन्याचा कळस अर्पण केला होता. यामध्ये चोरी झालेल्या कळसाची किंमत सव्वा लाख रुपये आहे. एकविरा देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.चोरीची घटना घडली आणि हे सर्व  मंगळवारी  उघड झाले आहे. यामध्ये असे की मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले होते.