शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (10:23 IST)

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि काटोलचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी अंमलबजावणी संचलनालय (ED) चे अधिकारी दाखल झाले आहेत.
 
याआधी नागपुरात सहा उद्योगपतींवर ईडीने छापेमारी केली होती. हे सहा उद्योगपती अनिल देशमुख यांच्या आणि कुटुंबीयांसोबत व्यावसायिक भागिदारीत असल्याचा ईडीला संशय आहे.
 
दुसरीकडे, एएनआयनं वृत्त दिलंय की, अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी काल (24 जून) ईडीनं डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला आहे.
 
अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. 14 एप्रिलपासून अनिल देशमुखांची सीबीआय चौकशीही सुरू झाली आहे.
 
सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं होतं.