गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (18:09 IST)

माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फुलवाल्याला धमकावत म्हणाले ‘अंदर डाल देंगे’ - संजय राऊत

sanjay raut
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला. या आरोपांसोबत त्यांनी आपल्याला आलेले अनुभवही पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या मुलीच्या लग्नाच्या डेकोरेशनसाठी आलेल्या फुलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली.
 
मुलीच्या लग्नात घडलेल्या या प्रसंगावर बोलताना राऊतांनी फूलवाल्यासोबत घडलेल्या प्रसंगावरुन ईडीवर थेट हल्लाबोल केला. फूलवाल्याला जेव्हा पैशांबाबत विचारणा करण्यात आलेली तेव्हा त्यानं कोणतेही पैसे न घेतल्याचं म्हटलंय. राऊतांची मुलगी ही माझ्या घरातल्याप्रमाणेच आहेत. तिला मी लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. तिच्या लग्नात मी पैसे कसे काय घेऊ, असं म्हटल्यानंतर गन पॉईन्टवर त्याला ईडीच्या लोकांनी धमकावलं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
 
संजय राऊतांनी मुलीच्या लग्नातला अनुभव तर सांगितलाच. शिवाय राऊतांचे निकटवर्तीय असलेल्या स्वप्ना पाटकर यांच्यावरुनही गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशातच थेट निशाणा साधत राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामगिरीवर गंभीर आरोप केले. लवकर पुराव्यानिशी याबाबत बोलणार असल्याचं राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. ही पत्रकार परिषद आपण ईडी कार्यालयासमोर घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.