बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (19:03 IST)

वऱ्हाड्यांच्या गाडीचा अपघात

accident
धुळे : धुळे तालुक्यातील वडेल येथून कांचनपूर लग्नासाठी वधूला घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाला धुळे-शिरपूर महामार्गावर तिसगाव धांदणे फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
 
धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने वाहनाला धडक दिली. या अपघातात दहा ते पंधरा नववधू जखमी झाले आहेत. सोनगीर टोलनाक्यावर जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघात होताच वाहन चालक व आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.