शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (08:19 IST)

आठ न्यायाधिन कैद्यांनी केला राडा, दोन कैदी जखमी

jail
येरवडा कारागृहातून अमरावती मध्यवर्ती कारागृहात आलेल्या आठ न्यायाधिन कैद्यांनी येथील दोन कैद्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. कारागृह कर्मचाऱ्यांना सौम्य बळाचा वापर करुन तो हैदोस थांबविला. मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही कैद्यांना कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यत आले. ही घटना २१ जानेवारी रोजी ५ ते रात्री ११ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ कैद्यांविरुध्द २२ जानेवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.             
 
येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे या दोघांना अश्लील शिवीगाळ करुन येरवडा कारागृहातून आलेल्या आठ कैद्यांनी मारहाण केली आहे. ते मारहाण करत असताना कारागृहात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न दोन कर्मचाऱ्यांनी केला, मात्र त्यांनी ऐकले नाही व मारहाण सुरूच ठेवली. अखेर या कर्मचाऱ्यांनी शिटी वाजवून कारागृहातील ईतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना तत्काळ बोलवले. त्यावेळी अन्य कर्मचारी आल्यानंतर त्यांनी हा वाद सोडवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. या प्रकरणी कारागृहाचे सुभेदार एएसआय प्रल्हाद इंगळे यांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor