बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (11:14 IST)

पाच मुलं आणि नातवंड असलेल्या वृद्धाने 12 वर्षांच्या मुलीवर घरात नेऊन केलं दुष्कर्म

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका गावात एका 12 वर्षांच्या मुलीवर एका वृद्ध व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
 
बदनापूर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी ही घटना घडली त्यानंतर 65 वर्षीय आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपीला पाच मुले आणि नातवंडे आहेत.
 
त्याने सांगितले की पीडित मुलगी तिच्या मामाच्या घरी राहते आणि आरोपी देखील शेजारी राहतो. मंगळवारी मुलगी कोंबडी चरत असताना आरोपी व्यक्तीने तिला पकडले आणि जबरदस्तीने तिच्या घरी नेले. तिथे त्याने मुलीवर कथित बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी गावातून पळ काढला.
नंतर, मुलीने तिच्या मामाला घटनेबद्दल सांगितले आणि त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांचे एक पथक गावात गेले आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आरोपीला रात्री उशिरा पकडण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी 65 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
बदनापूर तालुक्यातील एका गावात 14 सप्टेंबर मंगळवारी रोजी दुपारी पीडित मुलगी घरासमोर एकटी कोंबड्यांना दाणे टाकत होती. त्यावेळी तिच्या घरात इतर सदस्य नव्हते. याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या शेतात राहणाऱ्या 65 वर्षीय आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेलं आणि तिथे तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला.
 
नंतर पीडित मुलीने कुटुंबातील लोकांना हकीकत सांगितली तेव्हा बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 
महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही काळात मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसून येत आहेत. पुणे, अमरावती, उल्हासनगर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना अलीकडेच घडल्यास असून मुंबईतील निर्भया हत्याकांडासारखी भयानक घटना ताजी असताना जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.