रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (21:15 IST)

लोकांची कामे होत नसतील तर निवडणुका लढवल्या जातील : संभाजी महाराज

sambhaji raje
स्वराज्य संघटना ही सामाजिक संघटना आहे, आमची आता तरी आगामी महापालिका जिल्हा परिषद राजकीय निवडणुका लढवण्याची इच्छा नाही. मात्र आगामी काळात लोकांची कामे होत नसतील तर निवडणुका लढवल्या जातील असं संभाजी महाराज यांनी  म्हटलं आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांनी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकात यश मिळवणाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. संभाजी महाराज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
शेतकऱ्यांना मदत करा फक्त मुंबईत बसून घोषणा नको
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण काय मदत करणार याचा सरकारकडे काही प्लान आहे का, हेक्टरी जी मदत तुम्ही करताय ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आहे  का अशी विचारणार संभाजी महाराजांनी सरकारला केली आहे. तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा मुंबईत बसून घोषणा करू नका’ अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.
 
पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलताना संभाजी महाराजांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करा अशी विनंती सरकारला केली आहे. न्यायलयाने मराठा समाज हा पुढारलेला आहे अस नमूद केलंय. त्यामुळे मागास आयोग नेमून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागणार आहे. मात्र दुर्दैवाने सरकाकडून ते अजून केले जात नाही असं त्यांनी म्हटलंय.
 
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत देखील संभाजी महाराज यांनी राजकारण्यांना सुनावलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, टीकाटिप्पणी यावर बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, ‘महाराष्ट्रात काय नेमकं काय चाललंय हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडलेला आहे. महाराष्ट्रातले हे राजकारण पाहून कुठेतरी महापुरुषांची ओळख, विचार पुसत चालले आहे असं वाटतंय. राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
 
गड किल्ले परदेशी कंपन्यांना विकासासाठी देण्याच्या वक्तव्यावर त्याबद्दल विचारलं असता ‘राज ठाकरे कुठल्या बेसवर गड किल्ले परदेशी कंपन्यांना विकासासाठी द्यावे असे वक्तव्य करतायेत हे मला माहीत नाही, मात्र सर्व शिवभक्तांनी आणि आपल्या देशातील एक्सपर्ट लोकांना घेऊन हे गडकिल्ले विकसित करणार आहे आणि पहिल्या टप्प्यात स्वतः राज्य सरकार बरोबर पंचवीस किल्ले विकसित करणार आहोत, अशी माहिती संभाजी महाराज यांनी दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor