शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (20:38 IST)

सांगलीत भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लँडिंग

सांगली जिल्ह्यातील एरंडोल गावातील शेतात भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे हे लँडिंग करण्यात आले. लष्कराचे हेलीकॉप्टर शेतात उतरल्यावर ते पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. सुदैवाने हेलिकॉप्टर मधील चारही सैनिक सुरक्षित आहे. 

सदर घटना सकाळी 11:30 वाजता घडली. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी लष्कराचे हेलिकॉप्टर नाशिकहून बेळगावकडे रवाना झाले. या हेलिकॉप्टर मध्ये 1चालक  आणि 4 सैनिक होते. 
हेलिकॉप्टरला बघण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली. 

नाशिकहून बेळगाव कडे जाणाऱ्या लष्कराचे हेलिकॉप्टर मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हेलिकॉप्टरच्या चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

 Edited By- Priya Dixit