शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (15:20 IST)

हायकोर्टाचे पुन्हा एकदा एनआयए निर्देश : मालेगाव बॉम्बस्फोट खटला लवकर संपवा

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात सुरू असलेला मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाली काढा असे निर्देश उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा एनआयएला दिले. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला जलदगतीने संपवणे बंधनकार असल्याची आठवण न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने एनआयएला करून देताना या खटल्याचीज आरोपी समीर कुलकणी केलेली याचिका निकाली काढली.
 
या खटल्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी समीर कुलकर्णी याने गेले अकरावर्षे प्रलंबित असलेल्या या खटल्याची जलदगतीने सुनावणी घेण्याची तसेच या सुनावणीचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्या याचिकोवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठा आज सुनावणी झाली. यावेळी समीर कुलकर्णी यांने गेले 11 वर्षे प्रलंबित असलेला हा खटला सहा महिन्यात निकाली काढावा असे निर्देष सर्वाच्च न्यायालयाने सुमारे दिड वर्षापूर्वी दिले होते.
 
मात्र सतत या ना त्या कारणाने तपासयंत्रणा आणि इतर काही आरोपी जाणूनबूजून हा खटला लांबवत असल्याचा आरोप केले. आज जामिनावर असूनही आपण समाजात उघडपणे वावरू शकत नाही, कारण जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत लोकांच्या नजरेला आपण नजर मिळवू शकत नाही. याकउे न्यायालयाचे लक्षवेधून खटलाची नियमित सुनावणी घेऊन निकाली काढण्याचे आदेश द्या अशी विनंती न्यायालयाला केली.
 
मात्र, एनआयएने कुलकर्णि यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. न्यायालयाच्या निर्दशानंतर खटल्याची नियमित सुनावणी सुरू असून आतापर्यंत 475 पैकी 128 साक्षीदार तपासून झाले असून 369 साक्षीदार बाकी असल्याची माहिती एनआयएने न्यायालयालयाला दिली. याची दखल घेत न्यायालयाने या खटल्यातील उर्वरीत साक्षीदार तपासणीचा अपेक्षित कालावधी तपशीलवार सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं तपासयंत्रणेला देऊन याचिका निकाली काढली.