बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:14 IST)

मास रॅपिड पब्लिक ट्रान्स्पोर्टइलेक्ट्रीकल, टायर मेट्रोला मंत्रिमंडळात मान्यता

स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मास रॅपिड पब्लिक ट्रान्स्पोर्टइलेक्ट्रीकल टायर मेट्रो प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच नाशिक मेट्रोचा कामाचा शुभारंभ होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक मेट्रोचा महात्वाकांशी प्रकल्प राबविण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती व त्याबद्दल एक समिती गठीत करत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी घोषणा केली होती. अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक मेट्रोलासार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या टायर मेट्रोला भविष्यात बदलून त्याच जागी रेल्वे सुद्धा करता येणार आहे.
 
शहरातील दोन मार्गांवर ही मेट्रो धावणार आहे. यासाठी गंगापूर गाव ते नाशिक रोड २२ कि.मी.चा मार्ग निश्‍चित करण्यात आलेला आहे. या मार्गावर १९ स्थानके राहणार असून, त्यावरुन प्रति तास ६ हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता राहणार आहे. तसेच दुसरा मार्ग हा गंगापूर गाव ते मुंबई नाका व्हाया नांदूर नाका असा १० किमीचा राहणार आहे.या मार्गावरून तासी २८०० प्रवासी प्रवास करण्याची क्षमता राहणार आहे.
 
या मार्गावर १० स्टेशन असणार आहे. या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या पूढाकाराने शहर बससेवेसाठीच्या अत्याधूनिक मेट्रो बसेस या मार्गावर जोडण्यासाठी विशेष एस्कीलेटर्स निर्माण केले जाणार आहेत.
 
मुंबई नाका ते गरवारे मार्गाच्या प्रस्तावाचा विचार केला जात आहे. नाशिक रोड नांदूर नाका मार्गे शिवाजी नगर हा मार्गही तयार करण्याचा प्रस्ताव असून तो पूढच्या टप्पातील काम राहणार असल्याचे समजते.या दोन मार्गांव्यतिरिक्त २८ किलोमीटरचा फीड रूटचा अवलंब केला जाणार आहे. यात पहिला रूट मुंबई नाका ते सातपूर व्हाया गरवारे हा १२ किलोमीटर आणि दुसरा मार्ग नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूरनाका १६ किलोमीटरचा असेल असा गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितलेला मार्ग होता.
 
पहिला मार्ग गंगापूर, शिवाजी नगर, श्रमिकनगर, महिंद्रा, शनैश्वरनगर, सातपूर कॉलनी, एमआयडीसी, एबीबी सर्कल, पारिजातनगर, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, गायत्रीनगर, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिकरोड रेल्वेस्टेशन असा 22 किलोमीटरचा मार्ग असेल.
 
दुसरा मार्ग गंगापूर, जलापूर, गणपतीनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबईनाका असा 10 किलोमीटरचा मार्ग असेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
मास रॅपिड पब्लिक ट्रान्स्पोर्टइलेक्ट्रीकल कोचची लांबी-25 मीटर 
प्रवासी क्षमता २४० ते २५० 
पूर्णत्वाची मुदत २०२३ 
किमान आवाज व झिरो पोल्यूशन’ 
बससेवेला रेल्वेत बदलण्याची तजविज 
एलिव्हेटेड कॉरीडॉरदोन जंक्शन असणारपहिल्या मार्गावर 19 थांबे
दुसर्‍या मार्गावर १० थांबे असतील.