1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (12:35 IST)

11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीची सक्ती नाही, परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळणार

State Curriculum Framework
आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी घालतात. इंग्रजी भाषा आवश्यक भाषा आहे असे मानले जाते. परंतु आता इयत्ता 11 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची सक्ती नाही. महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद(SCERT) ने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यात केलेल्या शिफारशींमध्ये इंग्रजी भाषा अनिवार्य मानली जाणार नाही. ती परदेशी भाषा म्हणून निवड करू शकतो. 

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने राज्याचा अभ्यासक्रमाचा आराखडा गुरुवारी जाहीर केला असून या मसुद्यावर 3 जून पर्यंत आक्षेप आणि सूचनांची नोंद करता येईल. 
महाराष्ट्र एससीईआरटीने तयार केलेल्या मसुद्याच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी आणि 12वीसाठी आठ विषय असतील. यामध्ये दोन भाषा, चार ऐच्छिक विषय आणि दोन अनिवार्य विषयांचा समावेश आहे.

मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तमिळ, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, पाली, तेलुगु, अर्धमागधी,प्राकृत, पर्शियन, या भाषांबरोबर आता  फ्रेंच, जर्मन, जपानी, कोरियान, या परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळेल.

इयत्ता 11 वी आणि इयत्ता 12 वी अभ्यासक्रमात 8 विषय असणार असून त्यापैकी 2 भाषा, 4 वैकल्पिक आणि 2 विषय अनिवार्य असतील. सध्या जरी 11 वी आणि 12 वी ला इंग्रजीची सक्ती आहे .मात्र या पुढे इंग्रजीची सक्ती नसेल. 
 
Edited by - Priya Dixit