गोदावरी खोऱ्यात येणार इतके टीएमसी पाणी; जलसंपदामंत्र्यांनी सांगितला संपूर्ण प्लॅन

Jayant Patil
Last Modified शुक्रवार, 25 मार्च 2022 (08:15 IST)
कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी आवश्यक २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी उपलब्ध कशा प्रकारे करता येईल याबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. विधान परिषदेतील २६० अन्वये झालेल्या चर्चेवर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.टाटा जलविद्युत प्रकल्प समुहातून वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणारे भिमा खोऱ्याचे ४२.५० टीएमसी पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून काही पाणी भिमा खोऱ्यात उपलब्ध करून देता येईल का? याबाबत सुर्वे समिती स्थापित केली असून समितीद्वारे अभ्यास प्रगतीपथावर आहे. सुर्वे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याबाबत पुढील निर्णय घेता येईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

वळण बंधाऱ्यांचा वापर करून आपण नाशिक जिल्ह्यात पूर्वेचे पाणी पश्चिमेला आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला मोठी गती आली आहे. एकूण ३० प्रवाही वळण योजनांद्वारे ७.४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे नियोजन आहे. या पैकी १४ वळण योजनांची कामे पूर्ण झाली असून त्याद्वारे १.०७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळण्यात येत आहे. ५ योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर असून या योजना जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित ११ प्रवाही योजना भविष्यकालीन आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.तसेच गोदावरी खोऱ्यासाठी इतर नदीजोड योजनाही प्रस्तावित आहेत. दमणगंगा-एकदरे-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, पार-गोदावरी अशा व इतर नदीजोड योजनांद्वारे साधारणतः ८९ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आखणी केली आहे तसेच साधारणतः ११ टीएमसी पाणी तापी (गिरणा) खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
वीजनिर्मितीनंतर कोळकेवाडी धरणातून ६७.५ टीएमसी पाणी वशिष्ठी नदीत सोडण्यात येते यापैकी १७.५ टीएमसी पाणी दक्षिण कोकणात सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रास वापरण्याचे नियोजित आहे. उर्वरित ५० टीएमसी पाणी उत्तर कोकणात वापरणे नियोजित आहे. याबाबतचा अभ्यास WAPCOS या संस्थेमार्फत सुरू आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.अमरावती विभागातील अनुशेष भरून काढण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, शासनाला यात बऱ्यापैकी यश आले आहे. विदर्भ क्षेत्रासाठी राज्यपालांच्या २०२०-२१ च्या निर्देशाप्रमाणे २५.६५५ टक्के निधी वितरित केला जातो. विदर्भातील ८१ टक्के अनुशेष दूर झालेला असून उर्वरित अनुशेष जून २०२४ पर्यंत दूर करण्याचे नियोजन आहे असेही मंत्री श्री.जयंत पाटील यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या ...

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढणार : एसी लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ...

कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट

कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट
रत्नागिरी :रायगड जिल्ह्यात नौकेवर सापडलेल्या संशयास्पद शस्त्रसाठ्यामुळे किनारपट्टीवरील ...

“प्रो गोविंदा”स्पर्धा घेण्याची घोषणाबक्षिसांची रक्कम ...

“प्रो गोविंदा”स्पर्धा घेण्याची घोषणाबक्षिसांची रक्कम शासनामार्फत
“प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ...

“..तर याची किंमत राज्यातल्या गावांना मोजावी लागेल”

“..तर याची किंमत राज्यातल्या गावांना मोजावी लागेल”
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना ...

नरिमन पॉईंट –दिल्ली अवघ्या १२ तासांत प्रवास

नरिमन पॉईंट –दिल्ली अवघ्या १२ तासांत प्रवास
दिल्ली – मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून हा महामार्ग मुंबईतील ...