शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2024 (12:13 IST)

महाराष्ट्रात EVM प्रकरण पुन्हा तापणार, राहुल गांधी-प्रियांका गांधी-केजरीवाल येणार एकत्र

Maharashtra News: महाराष्ट्रात ईव्हीएममधील बिघाडाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मरकड वाडीला भेट देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याबाबत माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 5 जानेवारीला मरकडवाडीत येणार आहे. त्यामुळे राहुल गांधी, प्रियांका आणि केजरीवाल 10 जानेवारीला मरकडवाडीत येण्याचा विचार करत आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी 2024 च्या मतदानानंतर 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाच्या संगनमताने ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपने निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे.
 
याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात विरोधकांकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मरकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी मरकडवाडीत जात आहे अशी माहिती समोर आली आहे.

Edited By- Dhanashri Naik